मुंबई : मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय.
'जेबाँग' या फॅशन साईटवर हक्क प्रस्थापित झाल्यानंतर आता फ्लिपकार्ट अमेझॉन, स्नॅपडील, फ्युचर ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स यांसारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर द्यायला सज्ज झालंय.
विक्रीत घट झाल्यानं जेबाँगला नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यानंतर, जवळपास ७ करोड डॉलरमध्ये फ्लिपकार्टनं जेबाँगला खरेदी केलंय. ही वेबसाईट विकत घेण्यासाठी इतरही कंपन्या उत्सुक होत्या.
आता, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी प्रस्थापित केलेल्या फ्लिपकार्टकडे मिंत्रा आणि जेबाँग या दोन सबसिडरीज आहेत.