पास होण्यासाठी ठेवली उत्तरपत्रिकेत ५०० ची नोट

काहीही अभ्यास केला नसेल तरीही परीक्षेत पास होण्याची बहुतांशी विद्यार्थ्यांची तसेच आजकाल पालकांचीही अपेक्षा असते. मात्र यूपीमधील विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी काही नवीन उपाय शोधून काढले आहे. 

Updated: Apr 17, 2015, 05:27 PM IST
पास होण्यासाठी ठेवली उत्तरपत्रिकेत ५०० ची नोट title=
कानपूर: काहीही अभ्यास केला नसेल तरीही परीक्षेत पास होण्याची बहुतांशी विद्यार्थ्यांची तसेच आजकाल पालकांचीही अपेक्षा असते. मात्र यूपीमधील विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी काही नवीन उपाय शोधून काढले आहे. 
 
यूपीमधील दहावी आणि बारावीच्या परिक्षेत पास होणे विद्यार्थ्यासोबतच पालकांनाही प्रतिष्ठेचे असते. मात्र त्यासाठी अभ्यास न करता देखील विद्यार्थी पास झाला पाहिजे ही 
विद्यार्थ्यासोबत पालकांची देखील अपेक्षा असते. हेच कारण आहे की येथील बोर्डाच्या परीक्षेतील महत्व कमी होत आहे. 
 
कानपूरच्या पाच केंद्रांवर पेपर तपासणीचं काम सुरू आहे. त्यात शिक्षकांना उत्तरपत्रिकेत मिळणारी माहिती चकीत करणारी आहे. कारण विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या उत्तरांच्या जागी गणपतीची आरती लिहिली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी आजारी असल्याचे कारण देत पास करण्याची विनंती केली आहे.
 
काही विद्यार्थ्यांनी तर चक्क उत्तरपत्रिकेत पैसे ठेवले आहेच. कोणी 500ची नोट ठेवली आहे, तर कोणी 100ची नोट ठेवली आहे. अशा अनेक नोटा उत्तरपत्रिकेतून निघत आहेत. काहीनी आपला रोल नंबर आणि फोन नंबर उत्तर पत्रिकेत लिहिले आहेत. मात्र शिक्षकांनी स्पष्ट केले आहे की, या सगळ्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर होणार नाही. 
 
काही शिक्षकांनी सांगितले की, उत्तरपत्रिकेत पैसे ठेवण्याची पद्धत जुनी आहे. मात्र आता शाळा-कॉलेजातच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.