दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

दिल्लीच्या पांडव नगर भागात एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पहिल्या माळ्यावरुन उडी मारुन स्वत:चा जीव वाचवला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Mar 13, 2017, 12:54 PM IST
दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या पांडव नगर भागात एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पहिल्या माळ्यावरुन उडी मारुन स्वत:चा जीव वाचवला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुळची नेपाळची असणाऱ्या या महिलेला दिल्लीतील पॉश भागात ५ जणांनी गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला नग्न अवस्‍थेतच बाथरूममध्ये बंद केलं. महिलेने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरुन उडी मारली.

एका आरोपीने महिलेवर लैंगिग अत्याचारही केले. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. २८ वर्षीय या महिलेला नवीन देशमुख या युवकाने फिरण्यासाठी घेऊन जाण्याच्या बहान्याने फ्लॅटवर घेऊन आला. तेथे त्याचे मित्र प्रतीक कुमार, विकास मेहरा, सर्वजीत आणि लक्ष्य हे आधीपासून उपस्थित होते.

पांचही युवक दारुच्या नशेत होते. बलात्कार करुन महिलेला मारण्याची धमकी दिली. रविवार सकाळी जवळपास ५.३० वाजता महिलेने नग्न अवस्थेत पहिल्या माळ्यावरुन उडी मारली. लोकांनी जेव्हा तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा पोलिसांना सूचित करण्यात आलं, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.