लखनऊ: गर्लफ्रेंडची अश्लिल चित्रफीत तयार करून तिला धमकी देण्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात पण लखनऊमध्ये एका गर्लफ्रेंडनंच बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो टाकून त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे.
लखनऊमधील एक तरुणी आणि तरूण या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वीच मैत्री झाली होती. मैत्रीखातर त्यानं तिच्या बहिणीला आपल्या कार्यालयात टेलिकॉलर म्हणून कामाला लावतो, असं आश्वासन दिलं होतं. या कामासाठी दोघं नेहमी भेटत असत. फ्रेंडशिप डे निमित्त हे दोघं एका पार्टीत जाणार होते. मात्र पार्टीला जाण्यासाठी आपल्या साडेचार हजार रूपयाची पर्स आणि महागडी स्कर्ट घेवून देण्याची मागणी तरुणीनं तरुणाला केली.
मात्र त्यानं ही मागणी फेटाळली आणि तो तिला भेटण्याचं टाळू लागला. 4 ऑगस्टला तरुणीनं जवळपास 100 वेळा त्याला फोन केले आणि 50हून अधिक मॅसेजेस केले. शिवाय 2 लाख रुपये दे, माझ्या बँकेच्या खात्यात 20 हजार टाक, नाहीतर परिणामांना सामोरं जा, अशा धमक्या ही तरुणी देवू लागली.
तरुणानं या सर्व धकम्यांकडे दुर्लक्ष केलं. पण तरुणीनं अश्लील फोटोला एडिट करून तरुणाचा फोटो त्यावर लावला आणि असा अश्लील फोटो फेसबुकवर खोटं अकाऊंट तयार करून अपलोड केला. तरुणाला घटना कळताच त्यानं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. मात्र अद्याप तरुणीला अटक करण्यात आलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.