रोहतक : रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बहिणींनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलंय, राज्यात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही प्रभावी पावलं उचलली जातील.
या प्रकरणी तीन युवकांना अटक करण्यात आली आहे, तसेच या आरोपींनी पोलिस कोठडी देण्यात आल्याचंही रोहतकच्या पोलिस अधिक्षकांनी म्हटलंय.
बसच्या ड्रायव्हर कंडक्टर्सनाही याबाबतीत आदेश देण्यात आले आहेत की, अशी कोणतीही घटना घडल्यास लवकरच पोलिसांना माहिती देण्यात यावी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.