नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याचिकाकर्त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार महाराष्ट्र सरकार कार्यवाही करण्यास तयार असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगणार आहे.
महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात याचिकाकर्त्याला पाठिंबा देणार आणि सकारात्मक बाजू मांडणार आहे. मुंबई हायकोर्टात १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. औरंगाबादच्या विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण तातडीने निकाली काढण्यासाठी याचिकाकर्त्याच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत यापूर्वी हायकोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या स्थगितीली सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं.