मुंबई : ऑगस्टमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात होणार आहे.
पुढच्या महिन्यात १६ ऑगस्ट वगळता तब्बल पाच दिवस जोडून सुट्ट्या आहेत. त्यामुळं एक दिवस सुट्टी टाकली तर कर्मचाऱ्यांना सलग सहा दिवस फॅमिलीसोबत पिकनिक एन्जॉय करता येणार आहे.
१३ ऑगस्टला दुसरा शनिवार असून रविवारची सुट्टीच आहे तर सोमवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. १७ ऑगस्टला पारशी नवीन वर्ष तर १८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्यामुळं जोडून दोन दिवस सुट्टी आहे.
त्यामुळं आतापासूनच पिकनीकचं प्लानिंग करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झालीय.