तो एकटाच गेला हनीमूनला...पण त्यांने घेतली सुषमा स्वराज यांची मदत

दोघांचा हनीमूनला जाण्याचा बेत ठरला. दोघेही विमानतळावर पोहोचले. मात्र, पतीलाच एकट्याने विमानप्रवास करावा लागला. एकट्यानेच हनीमून कसे करायचे, असा प्रश्न त्याला पडला आणि त्यांने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली. 

PTI | Updated: Aug 9, 2016, 04:11 PM IST
तो एकटाच गेला हनीमूनला...पण त्यांने घेतली सुषमा स्वराज यांची मदत title=

नवी दिल्ली : दोघांचा हनीमूनला जाण्याचा बेत ठरला. दोघेही विमानतळावर पोहोचले. मात्र, पतीलाच एकट्याने विमानप्रवास करावा लागला. एकट्यानेच हनीमून कसे करायचे, असा प्रश्न त्याला पडला आणि त्यांने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली. 

ऐन वेळी पत्नीचा पासपोर्ट हरवला. त्यामुळे पती महाशय एकटेच हनीमूनसाठी निघून गेले. मात्र, त्याला मजा आली नाही. शेवटी फैजान पटेल याने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत सुषमा स्वराज यांची मदत मागितली. 
 
सुषमा स्वराज यांनी याची दखल घेतली. 'तुमच्या पत्नीला माझ्याशी संपर्क साधायला सांगा. तुमच्यासोबत बाजूच्या सीटवर ती असेल याची खात्री देते', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केले. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डुप्लिकेट पासपोर्टही मिळवून दिला. त्यामुळे दोघांना हनीमूनचा आनंद लुटता आला. या दांपत्याने सुषमा स्वराज यांचे खास आभार मानलेत.