चुमार : चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.
चीनच्या काही नागरिकांनी सीमेवर येऊन भारतीय लष्कराला चीनी भाषेत काही फलक दाखवले आहेत. चुमार भागात चीनी लष्काराची घुसखोरी सुरूच आहे, यासाठी सैनिकांची कुमक सीमेवर पाठवली जात आहे.
यापूर्वीही चीनी सैनिकांनी काही ठिकाणी घुसखोरी केली होती. तेव्हा भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना धक्के देऊन सीमेबाहेर घालवलं होतं. सीमा रेषा आहे हे तुम्हाला माहित नाही का? याच्या आत येणे बेकायदेशीर असल्याचं भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना सुनावलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.