नवी दल्ली : जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.
देशात सर्वाधि लोकांच्या जेवणात भात हा असतोच. त्यामुळे देशावर खाद्यान्नाचे संकट येण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहे. ह्यूलेट फाउंडेशनचे प्रोग्राम ऑफिसर मॅट बेकर यांनी सांगितले आहे की, भारतीय उपमहाद्वीपचे तापमान २०३० पर्यंत खूप वाढणार आहे. त्यामुळे भात शेतीला धोका आहे. या तापमानात भाताचे उत्पादन घेणे कठीण होणार आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, यावर उपाययोजना करण्यासाठी भारताने अरब डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत भारत वातावरणात अरोसॉल्स मिसळणार आहे. त्यामुळे तापमानावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तसेच तापमान कमी होण्यासाठी आपण सौर विकीरणांचे व्यवस्थापन करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.
जगातील १५ कोटी हेक्टर जमिनीमध्ये ४५ कोटी टन तांदळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच त्यातील २० टक्के उत्पादन हे भारतात घेतले जाते. भारतातील ४.२ कोटी हेक्टर जमिनीमध्ये ९.२ कोटी मिट्रीक टन तांदुळ पिकतो. भारतातील पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटक, उडिसा, आसाम आणि पंजाब या राज्यांतील भात हे प्रमुख अन्न आहे.
तसेच जागतिकीकरणाचा परिणामही निसर्गावर होत आहे. त्यामुळे नद्यांनी आपले प्रवाह बदलले आहेत. कॅनडामधील एका नदीने आपला प्रवाह बदलला आहे. तिला संशोधक जलवायू परिवर्तनाची प्रमुख सीमा म्हणून ओळखतात. तसेच अती उष्णतेमुळे ग्लेशियरमधील बर्फही मोठ्या प्रमाणात विरघळत आहे. या सर्वाचा परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतो.