www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रातील यूपीए सरकारचा टू-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा देशभर गाजत असतानाच भारतीय लष्कराचे जवान फाटके बूट घालून सिमेवर पाहारा देत आहेत. लढण्यासाठी जवानांसाठी अत्याधुनिक बूट घेण्यास केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
सरकराच्या बोटचेप्या धोरणामुळे सुमारे ८० कोटी रुपयांच्या बूट खरेदी फाईलवर धूळ साचली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सरकार दफ्तरी ही फाईल धूळ खात पडली आहे. सरकारच्या बेफिकीरीमुळे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी लढणार्या जवानांना फाटलेले बूट शिवून शत्रुंचा सामना करावा लागत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.
कधी बर्फाळ काश्मीर, घनदाट जंगल, दर्यानखोर्याश यात भारतीय जवानांना शत्रुंचा सामना करावा लागतो. असे असताना लष्करी जवानांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष पुरविणे हे सरकारचे काम आहे, पण सरकारला जवानांचे काहीच सोयरसुतक नसल्याने दिसून येत आहे.
जवानांना आदिदास, रिबॉक, नाईके यासारख्या नामांकित कंपनीचे दर्जेदार स्पोर्टस् शूज देण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ सेनाधिकार्यां नी लष्करप्रमुख विक्रमसिंह यांच्याकडे केली आहे. पण या बुटांच्या खरेदीसाठी गेल्या दहा वर्षांपासून पैसेच नसल्याचे कारण सांगत सरकार स्वस्थ बसून असल्याचे लष्करी अधिकार्यांदनी म्हटले आहे.
दहा वर्षांपासून भारतीय जवानांना साधे कॅनव्हास बूट घालूनच सिमेवर खडा पाहारा देत आहेत. बर्यारच वेळा तर अनेक जवानांवर जुने बूट शिवून पुन्हा तेच वर्षानुवर्षे घालायची वेळ येत असल्याचे या अधिकार्यांेनी सांगितले.