www.24taas.com, नवी दिल्ली
सर्वसामान्य माणसांचे पैसे लुटण्यात ‘रेल्वे’ही सुसाट निघाली आहे. टिकिट खिडकीवर सुट्टे पैसे नसल्याचं कारण देत प्रत्येक तिकिटामागे चार रुपये जास्त घेणं आता कायदेशीर करून टाकलं आहे. याहून मोठी गोष्ट म्हणजे रेल्वेची वेबसाइट असणाऱ्या IRCTC वर ऑनलाइन रिझर्वेशन करतानाही बँक अकाउंटमधून राऊंड फिगरने पैसे कापले जात आहे.
IRCTC या रेल्वेच्या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन रिझर्वेशन केलं जातं. IRCTCवर व्यवहार होताना आपल्या बँक अकाउंटमधून पैसे जात असल्याने तिथे खरंतर सुट्या पैशांचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तरीही बँक अशाउंटमधून तीन-चार रुपये जास्त कापले जात आहेत. आणि त्या वाढलेल्या पैशांवरच इतर चार्जेस लावले जात आहे.
IRCTC साइटवर जर आपलं तिकिट ११६ रुपये असेल, तर बँक अकाउंटमधून १२० रुपये कापले जात आहेत. त्यावर लादला जाणारा करही ११६ रुपयांवर नाही, तर १२० रुपयांवर आकारला जात आहे. २२ जानेवारीपासून सुट्टे पैसे नसल्याचा कांगावा करत जास्त पैसे घेणं वैध केलं आहे. सुट्टे पैसे नसल्यास पाच रुपये अधिक घेणं आता कायदेशीर बनवलं गेलं आहे.