www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
इशरत जहाँ एनकाऊंटर प्रकरणी उद्या सीबीआय आरोपपत्र दाखल करणारेय. या आरोपपत्रामध्ये काही नवी नावं समाविष्ट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
इशरत जहाँ एनकाऊंटर केसमध्ये सीबीआय बुधवारी आरोपपत्र दाखल करणारेय. अहमदाबादच्या विशेष सीबीआय कोर्टात दाखल करण्यात येणा-या आरोपपत्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण या आरोपपत्रामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शाह आणि काही पोलीस अधिका-यांचंही नाव समाविष्ट केलं जाण्याची शक्यताय. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस, सीबीआयचा अस्त्रासारखा वापर करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय.
तर दुसरीकडे काँग्रेकडून, वारंवार इशरत जहाँ एनकाऊंटर प्रकरण खोटंच असल्याचा आरोप होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सीबीआयच्या आरोपपत्रातून काय बाहेर येतं याकडंच सगळ्यांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.