जयललितांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजना

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यासाठी अनेक सामाजिक योजना सुरु केल्या. यामध्ये कन्या कन्या भ्रूण हत्या या समस्येपासून निपटण्यासाठी त्यांनी क्रेडल टू बेबी स्कीम योजना सुरु केली. मुलींना जन्म देणाऱ्या महिलांना मोफत सोन्याचं नाणं दिलं जात होतं.

Updated: Dec 6, 2016, 10:37 AM IST
जयललितांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजना title=

चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यासाठी अनेक सामाजिक योजना सुरु केल्या. यामध्ये कन्या कन्या भ्रूण हत्या या समस्येपासून निपटण्यासाठी त्यांनी क्रेडल टू बेबी स्कीम योजना सुरु केली. मुलींना जन्म देणाऱ्या महिलांना मोफत सोन्याचं नाणं दिलं जात होतं.

तमिळनाडूमध्ये लोकं त्यांना प्रेमाने अम्मा म्हणायचे. अम्मा ब्रँडने मग जयललिता यांनी १८ लोककल्याणकारी योजना सुरु केल्या. अम्माच्या नावाने सुरु झालेल्या या योजना पूर्णपणे मोफत होत्या. ज्याच्यावर मोठ्या प्रमाणास सबसि़डी दिली जात होती.

या योजनेअंतर्गत शहरी भागात गरीबांसाठी एक रुपयात जेवन दिलं जात होतं. अम्मा कॅंटीन, अम्मा सॉल्ट, अम्मा वॉटर आणि अम्मा मेडिसीन या योजना देखील जयललितांनी सुरु केल्या. राज्यात ऑटोमोबाईल आणि आयटी सारख्या क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले.

जयललितांनी सुरु केलेल्या योजना
 
क्रॅडल टू बेबी स्कीम

गोल्ड फॉर मॅरिज स्कीम

अम्मा कँटीन

अम्मा वॉटर

अम्मा सॉल्ट

अम्मा मेडिसिन

अम्मा लॅपटॉप

अम्मा बेबी केअर किट

अम्मा सीमेंट

अम्मा ग्राइन्डर, मिक्सर, टेबल फॅन

अम्मा बीज

अम्मा सर्विस सेंटर

स्पेशल अम्मा कँप

अम्मा मोबाईल

अम्मा फार्मेसी

अम्मा मायक्रो लोन स्कीम

अम्मा आरोग्य थित्तम

चीफ मिनिस्टर कॉम्प्रिहेंसिव हेल्थ इंशोरेंस स्कीम

अम्मा सिनेमागृह

अम्मा जिम