नवी दिल्ली : गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय.
केंद्र सरकारनं लागू केलेल्या १ टक्के अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिक, छोटेमोठे सुवर्णकार आणि ज्वेलर्सनी गेल्या १ मार्चपासून शटर डाऊन केलं होतं. मात्र आता सराफांनी सरकारपुढं नमतं घेतलंय.
ग्राहक आणि छोट्या व्यापा-यांच्या हितासाठी बंद मागे घेत असल्याचं सराफ संघटनेचे नेते फतेचंद रांका यांनी स्पष्ट केलंय.