'आप'ने भ्रष्टाचाराचा केल्याचा कपिल मिश्रांचा आरोप

 आपमधून हकालपट्टी झालेले आणि दिल्ली सरकारमधले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची फैर झाडली. मोहल्ला क्लिनिक प्रकरणात आपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पार्टी फंडमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.

Updated: May 14, 2017, 12:49 PM IST
'आप'ने भ्रष्टाचाराचा केल्याचा कपिल मिश्रांचा आरोप

नवी दिल्ली : आपमधून हकालपट्टी झालेले आणि दिल्ली सरकारमधले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची फैर झाडली. मोहल्ला क्लिनिक प्रकरणात आपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पार्टी फंडमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.

'आप'ला 25 कोटींचा पार्टीफंड मिळाला. पण आपने केवळ 20 कोटी दाखवले. उरलेले 5 कोटी कुठे गेले असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. केजरीवाल यांच्या हवाला लिंक्स असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. तसंच केजरीवाल मनी लाँडरींगमध्येही गुंतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.