नवी दिल्ली : वयाच्या २३व्या वर्षी स्वत:चा जीव धोक्यात घालून ३५९ जणांचे प्राण वाचविणारी ती शूर तरुणी म्हणजे नीरजा भनोट. हायजॅक केलेल्या विमानात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून तिची हत्या केली होती.
नीरजाच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या १९ फेब्रुवारीला रिलीज होतोय. यात सोनम कपूरने नीरजाची भूमिका बजावलीये. नीरजा पनाम ७३ या विमानात होती. पाच सप्टेंबर १९८६ रोजी तिने नेहमीप्रमाणे विमानाची घोषणा केली. मात्र कोणाला माहीत होतं की ही तिची अखेरची घोषणा ठरेल.
यूट्यूबवर तिने केलेल्या घोषणेचा व्हिडीओ तुम्ही ऐकू शकता. ५ सप्टेंबरला दहशतवाद्यांनी हे विमान हायजॅक केले होते. नीरजा विमानाती प्रवाशांचे प्राण वाचवले मात्र ती स्वत:चा जीव गमावून बसली. ७ सप्टेंबर १९६३मध्ये नीरजाच्या मृत्यूनंतर तिला अनेक पुरस्कार देण्यात आले. तिला मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कारानेही सन्मानित कऱण्यात आलेय.