कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झालंय. 

Updated: Jan 25, 2016, 05:13 PM IST
कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र  title=

नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झालंय. 

कुपवाडा इथे झालेल्या चकमकीत कर्नल महाडिक यांना हौतात्म्य आलं होतं. पाकिस्तानातून सीमा पार करून आलेल्या दहशतवाद्यांच्या मागावर कर्नल महाडिक नेतृत्व करत असलेली राष्ट्रीय रायफल्सची  तुकडी होती. 

कुपवाडा जिल्ह्यातील मनिगाहच्या जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती.. या जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या सैन्यात चकमक झाली. या चकमकीत कर्नल महाडिक यांनी प्रचंड शौर्य गाजवलं. स्वतः पुढे होऊन कर्नल महाडिक यांनी मोठा पराक्रम गाजवला. 

अखेर महाडिक यांना दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्या लागल्या. यात ते गंभीर जखमी झाले. अखेर लष्करी रूग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज संपली. महाडिक मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले होतं.