नवी दिल्ली : हा बजेट शेतकऱ्यांसाठी फार काही घेऊन आला आहे, असं चित्र माध्यमांनी उभं केलं असलं, तरी आता यातील त्रुटी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे.
अर्थशास्त्रज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची बजेटवरील पहिली प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे. पुढील पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया मनमोहनसिंग यांनी दिली आहे.
मनमोहनसिंग म्हणाले, 'यंदाच्या बजेटमध्ये कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. परंतु, हे अशक्य आहे. हे कसे शक्य होईल, हे सरकार सांगू शकत नाही.'
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन 2016-17चा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला, त्यावर मनमोहन सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.