पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता त्यात भर पडली आहे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव याचं पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची. मोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात, अशी खरमरीत टीका केली.
मोदी हे केवळ कपडे धुण्यासाठी भारतात येतात. त्यांनी देशासाठी वेळ काढायला हवा, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना देशातील नागरिकांनी त्यांना परदेश दौरे करण्यासाठी निवडून दिलेले नाही.
दरम्यान, बिहारमधील नवीन सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देईल. जनतेसाठी काम करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करेन, असे यादव म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.