नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारमधील आणखी एका मंत्र्यांने आपली जीप सैल केली. राज्यमंत्री व्ही के सिंग मंगळवारी यांनी मीडियावर आपली आगपाखड केली. मीडिया प्रेस्टीट्युट्स असं संबोधलं.
व्ही के सिंग यांनी मीडियाची तुलना 'बाजार'वृत्तीशी केली. त्यामुळे व्ही के सिंग नव्या वादात सापडले आहेत. येमेनमध्ये भारतीय लोक पसल्याने यावर लक्ष ठेवून आहेत. याबाबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मीडियाला प्रेस्टीट्युट्स असे संबोधले.
त्यांच्या या व्यक्तव्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने याबाबत निषेध व्यक्त करत ही बाब असंवेदनशील अल्याचे म्हटले आहे. तसेच विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदविला आहे. मार्च २०१५ ला पाकिस्तान डे कार्यक्रमाला व्ही. के. सिंग यांनी खास हजेरी लावली होती. तेव्हापासून वादला तोंड फुटले आहे. मीझे कर्तव्य बजवत आहे, असे ट्विट त्यांनी केल्यानंतर वाद अधिकच वाढलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.