नवी दिल्ली : लष्कारातले जवान घरी आल्यावर, ते बाईकने मित्रांना आणि नातेवाईकांना भेटीसाठी निघतात, मात्र अशावेळीच जवानांचे सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे. बीएसएफ जवानांचे दुचाकी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी दुचाकी अपघातात ४२ जवानांचा मृत्यू झाला आहे.
'आमचे जवान ही आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. परंतु, अपघात आम्ही टाळू शकत नाही. मोटारसायकल अपघात ही आमच्यासाठी मोठी चिंता बनली आहे. अपघात टाळण्यासाठी आम्ही काही उपाययोजना आखत आहोत', 'बीएसएफ'चे महासंचालक डी. के. पाठक यांनी म्हटलंय.
'जवान सुट्टीवर असताना अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रत्येक महिन्याला ५ जवानांचा अपघाती मृत्यू होत आहे. जवान सुटीनिमित्त त्यांच्या घरी जात असतात. दरम्यानच्या काळात अपघात होऊन मृत्युमुखीच्या घटना घडत आहेत. सन २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान ४२ जवानांचा अपघाती मृत्यू झाला तर सीमेवर कारवाईदरम्यान १२ जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशी परिस्थिती आहे, असं पाठक यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.