सिरसा : हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.
तपास अधिकारी कुलदीप सिंग यांनी या प्रकरणात तीन आरोपींना दोषी ठरवले आहे. यात सासू मेना देवी पोलिसांनी ताब्यात नाही आहे. कोर्टाने गैर जमानती वॉरंट जारी केला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बेगू रोड येथील एक तरूणी लग्न करून २०११ मध्ये प्रीतनगर येथील निवासी प्रमोद कुमार यांच्या घरी आली. विवाहितेने पाच ऑगस्ट २०१४ मध्ये तक्रार दाखल केली की तिचा पती आणि सासू लग्नानंतर हुंड्यासाठी त्रास देत आहेत. हुंडा आणण्यास विरोध केला तेव्हा पती आणि सासूने तिला मारहाण केली. हद्द तेव्हा झाली या दोघांनी पतिचा मित्र रॉबिनकडून तिचे लैंगिक शोषण केले.
महिलेची मेडिकल रिपोर्ट आणि जबानीच्या आधारावर पती, सासू आणि मित्रा विरोधात केस दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी प्रमोद कुमार आणि रॉबिन यांना अटक केली आहे. सासू अजूनही फरार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.