कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनजी सरकारमधील आणि तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली. हा ममता यांना जोरदार झटका मानण्यात येत आहे.
दरम्यान, शारदा घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अटक केल्याने ममतादीदींना हा 'दे धक्का' आहे. निवडणुका डोळ्यासमोर भाजपने हे षडयंत्र रचले आहे. केंद्रातील भाजप सरकार येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सीबीआयमार्फत सूडभावनेने कारवाई केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केलाय.
तर दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टीच्या गुरुदास दासगुप्ता यांनी यात भाजपचा काहीही संबंध नाही. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते या घोटाळ्याशी संबंधित असल्याचा आरोप केला. भाजपाचे नेते सिद्धार्थ नाथ सिंग यांनीही आपण पहिल्यापासून तृणमूलच्या नेत्यांचा शारदा चिट फंड घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याचे सांगितले.
शारदा समूहाचे प्रमुख सुदीप्तो सेन यांच्याकडून मित्रा यांनी आर्थिक सहाय्य घेतले असा आरोप करण्यात आला आहे. तृणमूलच्या किती नेत्यांचा यात सहभाग आहे याबद्दलही चौकशी करण्यात येत आहे. तर शारदा घोटाळ्यातील पैशांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर झाल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सीबीआयने हे पाऊल उचल्याचे म्हटले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.