मुस्लिमांना हवेत गुजरातमध्ये मोदी - सरेशवाला

गुजरातमध्ये जे दंगे उसळले होते. त्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात येत असताना मुस्लिमांना गुजरातमध्ये मोदीच हवे आहेत. हे सांगितले उद्योगपती जफर सरेशवाला यांनी. त्यांनी मुस्लिमांना आवाहन केलेय की, मोदींच्या पाठिशी राहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 4, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातमध्ये जे दंगे उसळले होते. त्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चहुबाजूने टीका करण्यात येत असताना मुस्लिमांना गुजरातमध्ये मोदीच हवे आहेत. हे सांगितले उद्योगपती जफर सरेशवाला यांनी. त्यांनी मुस्लिमांना आवाहन केलेय की, मोदींच्या पाठिशी राहा.
गुजरातमध्ये मुस्लिम आणि मोदी यांच्यात पहिल्यांदा चर्चा घडवून आणणारे जफर स्वत: २००२च्या दंगलीतील पीडित आहेत. या दंगलीत त्यांना खूप नुकसान सोसावे लागले होते. या दंगलीनंतर त्यांनी गुजरातला बाय करून ते लंडन येथे गेले होते. मात्र, लंडनमध्ये २००३मध्ये मोदींशी झालेल्या भेटीनंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलला.
गुजराती मुस्लिमांना मोदींशी चर्चा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मुस्लिमांनी मोदीच्या पाठिमागे राहणे गरजेचे आहे. दरम्यान, दंगलीतील पीडित मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे, असे उद्योगपती जफर यांनी सांगितले.
सध्या गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यात हे व्यक्तव्य केल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे. ते सांगतात, सध्याच्या सरकारला नाकारुन मुस्लिम न्यायाची अपेक्षा करु शकत नाही. सरकारशी बोलावे लागेल. दरम्यान, कौन्सिल ऑफ इंडियन मुस्लिम्सचे अध्यक्ष जीना तसेच अनेक मुस्लिमांनी सरेशवाला यांच्यावर टीका टिपन्नी केली. ते संधीसाधू आहेत. त्यांच्या या विधानाच अनेकांनी तीव्र विरोध केला आहे.