नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी मोदी सरकारची झाडाझडती घेतलीय.
सरकार विचारधारेऐवजी व्यक्तीला प्राधान्य देत असल्याचा टीका मोहन भागवत यांनी केलीय. सरकार व्यक्तीकेंद्रीत होत चालले असून सरकार आणि मंत्र्यांमधला समन्वय कमी होत चालला असून दोघांमध्ये विश्वास राहिलेला नाही.
मंत्र्यांचे अधिकार कमी करण्यात आले असून पक्षाच्या पदाधिका-यांकडे बोलण्यासाठी काही राहिले नसल्याचीही खंत त्यानी व्यक्त केलीय. यामुळं तीन दिवसीय समन्वय बैठकीत भाजप आणि संघातल्या असमन्वयाचीच जास्त चर्चा होणार असल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.