ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका. 

Updated: Jul 31, 2016, 07:02 PM IST
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी title=

नवी दिल्ली : ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका. 

देशात सायबर क्राईमद्नारे होणाऱ्या लुटीचे प्रकार वाढले आहेत, एटीएम पिनकोड नंबर, एटीएमकार्ड नंबर विचारणे, बँकेतून बोलत असल्याचं सांगून ऑनलाईन बँकेतील पैसे काढणे, असे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी कल्पना, सूचना आणि विषय सुचविण्यात आवाहन करताना मोदी म्हणाले, 'स्वतंत्र भारतात जन्मलेला मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे. येत्या १५ ऑगस्टला मी देशाला संबोधित करणार आहे. माझ्या भाषणासाठी मला तुमच्याकडून काही सूचना, कल्पना, विषय हवे आहेत. कृपया तुमच्या कल्पना मोबाईल ऍपवर किंवा 'मायगव्ह'वर शेअर करा. 

'मन की बात' या कार्यक्रमाचा रेडिओद्वारे देशवासियांशी संवाद साधण्याच्या आज २२ वा भाग होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, 'खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवणारे ई-मेल आपण टाळायला हवेत.' तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेला हा एक दरोडाच असल्याचेही ते म्हणाले.