मथुरा: उत्तरप्रदेशच्या कासगंज भागामध्ये अवघ्या २०० रुपयांसाठी रेल्वे पोलिसांनी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होशियार सिंहला चालत्या रेल्वेतून फेकलं. यात खेळाडूचा मृत्यू झालाय. खेळाडूची चूक फक्त इतकी होती की, तो महिलांच्या डब्यात येवून बसला होता.
यासंपूर्ण घटनेत उत्तर प्रदेश पोलिसांनी जीआरपीच्या दोन शिपायांसह तिघांविरोधात हत्येच्या आरोपात गुन्हा दाखल केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेतील लक्ष्मी नगर भागात राहणारा होशियार सिंह हा तलवारबाजीमधील राष्ट्रीय खेळाडू होता. मुलगा युवराजच्या केशवपन करवून तो रेल्वेनं परतत होता. होशियार सिंह आपल्या कुटुंबियांसोबत कासगंजपासून मथुरेसाठी पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करत होते. त्यांची पत्नी आणि आई महिला डब्यात होते. तर स्वत: होशियार सिंह जनरल कोचमध्ये बसून होते.
काही वेळानंतर पत्नीची तब्येत बिघडल्यानं होशियार सिंह महिलांच्या डब्यात आले. तेव्हा तिथं उपस्थित जीआरपी जवानांनी होशियार सिंहला जायला सांगितलं. शिपायांनी महिलांचा डब्यात बसू द्यायला होशियार सिंहकडे २०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी पैसे द्यायला नकार दिल्यानं दोन्ही शिपायांनी त्याला चालत्या रेल्वेतून धक्का दिला. या घटनेत होशियार सिंहचा मृत्यू झालाय.
होशियार सिंह यांनी २००५ मध्ये तलवारबाजीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.