निर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने महिला आयोगाची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास विरोध दर्शवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. 

Updated: Dec 21, 2015, 11:50 AM IST
निर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली  title=

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी सुप्रीम कोर्टाने महिला आयोगाची याचिका फेटाळून लावली. अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास विरोध दर्शवत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. 

या प्रकरणाचा निर्णय कायद्याप्रमाणेच होईल. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे यावेळी कोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयावर निर्भयाच्या पालकांनी नाराजी व्यक्त केलीय. 

शनिवारी उच्च न्यायालयाने अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेचा निर्णय दिल्यानंतर महिला आयोगाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने अल्पवयीन गुन्हेगाराला दिलासा मिळालाय. 

निर्भया बलात्कार प्रकऱणातील अल्पवयीन दोषीला तीन वर्षे सुधारगृहात ठेवल्यानंतर रविवारी त्याची सुटका करण्यात आली. या दोषीच्या सुटकेविरोधात दिल्लीच्या जंतरमंतर येथे विरोधप्रदर्शनेही झाली. यात निर्भयाचे आई-वडीलही उपस्थित होते.