मी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.

PTI | Updated: Jan 11, 2015, 05:07 PM IST
मी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या' title=

नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.

प्रधान दररोज एका विशिष्ट्य व्यक्तीला (व्हिआयपी)ला फोन करून सब्सिडीवाला सिलेंडर घेणं बंद करण्याची विनंती केलीय. पेट्रोलियम मंत्री बनल्यानंतर प्रधान यांनी स्वत: स्वस्तात गॅस सिलेंडर घेणं बंद केलंय आणि तेव्हापासून ते बाजारभावाने सिलेंडर विकत घेत आहेत. 

प्रधान यांचं म्हणणं आहे की, सब्सिडी असलेलं सिलेंडर केवळ गरजू व्यक्तींना मिळायला हवं. त्यांच्या आग्रहानंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही सब्सिडीवालं सिलेंडर घेणं बंद केलंय आणि आज अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुद्धा हे पाऊल उचललं. ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून आपणही सब्सिडीवालं सिलेंडर परत केल्याचं म्हटलंय.

त्यांनी म्हटलं, "मला वाटतं श्रीमंत आणि संपन्न असलेल्या कुटुंब जे बाजारमूल्यानं एलपीजी सिलेंडर खरेदी करू शकतात, त्यांनी सब्सिडीवालं सिलेंदर घेणं जरूर बंद करावं. मी रोज फोनवर एका व्यक्तीला हे सांगतो. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना फोन करून मी असं सांगितलंय".

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.