चंबा : पत्नीला बदमान करण्यासाठी एखादा व्यक्ती किती खालच्या स्तराला जाऊ शकतो, हे तुम्ही विचारही करू शकत नाही. आरोपीने पत्नीसोबत घालविलेल्या काही खासगी क्षणांचा व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर अपलोड केला. हा धक्कादायक प्रकार शिमलाच्या ढली येथे समोर आला आहे.
या ठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ बनविले आणि बदनाम करण्यासाठी त्याला इंटरनेटवर अपलोड केले. एकूण २२ व्हिडिओ या निर्लज्ज माणसाने अपलोड केले असल्याचे समोर आले आहे.
पत्नीशी वाद झाल्यानंतर तिला बदनाम करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. ही गोष्ट पत्नीला कळाल्यावर ती सून्न झाली. दरम्यान, या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीची ही दुसरी पत्नी होती. तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत. पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीचे कम्प्युटर जप्त केले आणि त्यातून व्हिडिओ जप्त केलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.