सरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर

 केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत.  पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 16, 2017, 08:15 PM IST
 सरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर  title=

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत.  पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती. 

भुशापासून तयार झालेल्या पेट्रोलची किंमत ही सध्याच्या पेट्रोल पेक्षा निम्म्याने कमी होईल.  तसेच पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा विचाार आहे. 

भाजपच्या व्यापार प्रकोष्ठच्या मंडळीय संमेलनात धर्मेंद्र प्रधान बोलत होते.