पाटणा : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 49 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरवात झाली.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप मित्रपक्ष आणि महागठबंधन यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल.
दरम्यान, नक्षलग्रस्त भागात कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीनुसार चार वाजेपर्यंत आणि तीन वाजेपर्यंत मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत १० जिल्ह्यांतील ४९ जागांवर एकूण ५८३ उमेदवार रिंगणात आहेत.
बिहारमध्ये पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. आज सकाळपासून मतदारांनी मतदारकेंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.