नवी दिल्ली: केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता आणि सरकारमधला दुरावा कमी करण्यासाठी एक नवं वेबपोर्टल लॉन्च केलंय. mygov.nic.in असं या वेबसाइटचं नाव आहे.
विकासाची कामं करताना जनतेच्या सूचना थेट सरकारपर्यंत पोहचाव्यात यासाठी या वेबसाइटचा वापर करता येणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या प्रकल्पांविषयी भारतातील जनतेला आपली मतं थेट सरकारपर्यंत पोहचवता येणार आहेत.
सध्या या वेबसाईटवर गंगा स्वच्छता, मुलींचं शिक्षण, स्वच्छ भारत, कौशल्यपूर्ण भारत अशा सहा विविध विषयांवर जनतेला मतं मांडता येणार आहेत. ही वेबसाईट सरकार आणि जनतेमधील दरी कमी करण्यासाठीच वापर होईल, असं पंतप्रधानांनी वेबसाइट लॉन्चिंगच्या वेळी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.