आसाम : सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी लोहित नदीवर बनलेल्या या नदीची लांबी 9.15 किमी आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.
या ब्रिजमुळे चीनच्या सीमेवरील लष्कराला सहज वस्तू पोहोचवता येणार आहेत. ब्रिज बनवतांना या गोष्टीची काळजी घेतली गेली होती की यावरुन टी-72 टँक देखील सहज जाऊ शकतील. 876 कोटी रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट 2010 मध्ये सुरु झाला होता. 2015 पर्यंत हा बनवला जाणार होता. पण यासाठी २ वर्ष अधिक लागले. यामुळे 938 कोटी रुपय या पुलाचं बजेट झालं. याआधी वांद्रे-वरळी सीलिंक देशातील सर्वात मोठा पूल होता.
ढोला-सदिया ब्रिज बनल्यानंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतर कमी झालं आहे. यामुळे ४ तास लोकांचे वाचणार आहेत. लष्काराला वस्तू पुरवण्यासाठी जेथे २ दिवस लागत होते तो वेळ देखील आता वाचणार आहे.
चीन आणि भारताची एकूण 3488 किमीची सीमा आहे पण या लगत भारताचं एकही एयरपोर्ट नाही. इटानगरमध्ये फक्त एक हॅलीपॅड आहे. पण त्या बाजुला चीनने मात्र एयर स्टि्रप आणि चांगले रस्ते बनवले आहेत. अशात हा पूल भारतीय लष्कारासाठी देखील मोठ्या प्रमाणात कामात येईल.