सुटसुटीत न्यायव्यवस्थेसाठी ७०० कायदे रद्द करणार- पंतप्रधान

देशातील अनेक कायद्यांचा निकाल लावण्याचं काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलंय. अनावश्यक कायदे रद्द करण्याची मोहीम मोदी सरकारनं हाती घेतली आहे. 

Updated: Apr 5, 2015, 04:09 PM IST
सुटसुटीत न्यायव्यवस्थेसाठी ७०० कायदे रद्द करणार- पंतप्रधान title=

नवी दिल्ली : देशातील अनेक कायद्यांचा निकाल लावण्याचं काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलंय. अनावश्यक कायदे रद्द करण्याची मोहीम मोदी सरकारनं हाती घेतली आहे. 

दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांच्या संमेलनात बोलतांना पंतप्रधान म्हणाले, "सामान्य नागरिकांच्या न्यायव्यवस्थेकडून खूप अपेक्षा आहेत. न्यायाधीशच सर्वसामान्यांचे देव आहेत".  

देशाची न्यायव्यवस्था कायद्याच्या जंजाळात अडकून पडलीये आपल्या देशात विविध प्रकारचे १७०० कलम असून त्यातील ७०० कलम रद्द केले असून उर्वरित कलम रद्द करणार असल्याचा निर्णय भाजप सरकारनं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.