नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 12 वाजता लोकसभेत राष्ट्रपती अभिभभाषणावर सुरु असलेल्या धन्यवाद प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेवर उत्तर देणार आहेत.
पंतप्रधान मोदींचं उत्तर देऊन झाल्यानंतर दोन महत्वपूर्ण बिलांवर चर्चा होणार आहे. पहिलं कर्मचाऱ्यांना चेक किंवा डिजिटल माध्यमातून वेतन देण्याबाबत आणि दुसरं नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या नोटा घरात ठेवण्याच्या मर्यादेबाबत. दोन्ही विषयांवर सरकारने अध्यादेश आणला आहे.