नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधी यांचे नाव पुढे आले आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला नवसंजवनी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचे महासचिव म्हणून असलेले राहुल गांधी यांच्या नावाचा विचार केला जात आहे. सध्या काँग्रेसचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.
काँग्रेसला तरुण चेहरा हवा आहे. त्यामुळे काँग्रेसमधून काहींनी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिलाय. मात्र, काहींचा विरोध आहे. पक्ष म्हणून राहुल गांधी संभाळू शकत नाही, असे त्यांचे मत आहे.
दरम्यान, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर मायदेशात परतल्यानंतर काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राहुल गांधी यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.