नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा एक फोटोची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोत राजनाथ सिंह सैन्यातील एका जवानाकडून आपल्या बूट घालून घेताना दिसत आहेत.
गुरुवारपासून राजनाथ सिंह दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानलगतच्या सीमेवर सुरक्षेची पाहणी करण्यासाठी ते भुजच्या दौऱ्यावर गेले होते.
कोस्ट गार्ड आणि बीएसएफच्या जवानांमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर एका जवानानं राजनाथ सिंह यांना बूट चढवले तर दुसरा जवान या बुटाची लेस बांधण्यासाठी त्याची मदत करत होता. या दरम्यान राजनाथ सिंह खुर्चीवर बसून होते.
राजनाथ सिंह यांच्याबाबतीत असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... याआधीही ते अशा प्रकारच्या घटनांमुळे चर्चेत आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.