नवी दिल्ली : देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एका लिखीत प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकूण ५५७.७५ टन सोने आहे. पण देशातील जनता किती सोने जवळ बाळगते याचे आकडे सरकार ठेवत नाही. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही रिपोर्ट्स नुसार देशात एकूम २० हजार टन सोने जनतेकडे आहे.
सोन्याच्या आयातीवर खर्च होणार्या परकीय चलनासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर जेटली म्हणाले, २०१४-१५ या कालवधीत ३४.४१ अब्ज डॉलर सोन्याच्या आयातीवर खर्च करण्यात आले. तर २०१३-१४ या कालवधीत २८.७० अब्ज डॉलर तर २०१२-१३ या कालवधीत ५३.८२ अब्ज डॉलर सोनने आयातीवर खर्च झाले.
सोन्याची आयात करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे. दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.