मुंबई : देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
'इको रॅप' नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झालाय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार
- डिसेंबर अखेर रद्द झालेल्या जुन्या नोटांच्या किमतींपैंकी 50 टक्के किंमतीच्या नोटा बाजारात येतील
- जानेवारी अखेर रद्द झालेल्या नोटांच्या किमतींपैंकी 75 टक्के किंमतीच्या नव्या नोटा चलनात असतील
- आणि फेब्रुवारी अखेरी 78 ते 88 टक्के नव्या नोटा चलनात आलेल्या असतील
नोटा बंदीचा निर्णय लागू झाला त्यावेळी 500 च्या 17 अब्ज 16 लाख 5 हजार नोटा चलनात होत्या तर एक हजाराच्या सहा अब्ज 85 लाख 8 हजार नोटा चलनात होत्या.
पुन्हा एकदा तेवढ्याच किंमतीच्या नोटा बाजारात आणायच्या असतील आणखी दोन महिने लागतील, असा स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचं मत आहे.