मुंबई : देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा पुढं आलेत. त्यांनी ट्विट करुन कन्हैय्या कुमार निर्दोष असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपतेय. कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलाय.
कन्हैय्या कुमारवर लावण्यात आलेल्या देशद्रोहाच्या आरोपासंदर्भातले पुरावे आज पोलिसांना सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. शिवाय घोषणाबाजीचा मूळ स्त्रोत असणाऱ्या उमर खालिद अजूनही फरार आहे.
या उमर खालिद आणि इतरांच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी मुंबईमध्ये छापे मारलेत. तसंच अफजल गुरूच्या फाशीला एक वर्ष झाल्यानिमित्तानं ज्या पद्धतीनं जेएनयूमध्ये कार्यक्रम करण्यात आला, तसाच कार्यक्रम देशभरातल्या अठरा विद्यापीठांमध्ये करण्याची तयारी होती. त्यासाठी उमर खालीद आणि त्याच्या मित्रांनी य़ा विद्यापीठांची रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.