सिंहभूम : आई आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करते असं म्हणतात, पण गरीबीपुढे आईच्या प्रेमाला झुकावं लागण्याचा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. एका आदिवासी महिलेने आपल्या नवजात मुलाला ३ हजार रूपयात विकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
या महिलेने सरकारी रूग्णालयात मुलाला जन्म दिला, घरची परिस्थिती गंभीर होती, त्यामुळे या मुलाला घरी नेण्याची इच्छा चिंतामणीची नव्हती. पालनपोषण काय तर घरी गेल्यावर काय खायचं हा आणि पुढे मुलाचं पोषण कसं करायचं हा प्रश्न तिच्यासमोर होता.
नर्सला तिने हे सर्व सांगितल्यावर तिने मुल विकण्याचा पर्याय ठेवला. जमशेदपूरच्या एका दाम्पत्याला त्यांनी ३ हजारात हे मुल विकले. ही बाब उघड झाल्यानंतर सरकारी रूग्णालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.