जबलपूर: आजारी मुलाची काळजी घेता यावी, त्याचं संगोपन करता यावं म्हणून एका महिलेनं आपल्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी रितू (वय २७) हिला अटक केली असून सहा महिन्याच्या आरोहीला ठार मारून तिचा मृतदेह मंदिराजवळ टाकून दिल्याचं तिनं कबूल केलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितूनं ७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही तपासलं असता त्याता रितू आरोहीला एका बॅगमध्ये ठेवून स्कूटरवरून बाहेर जाताना दिसत होती. मात्र ती परत आल्यावर तिच्या हातात ती बॅग नव्हती.
हे पाहिल्यानंतर पोलिसांनी रितूला चौकशीस बोलावलं. पोलिसी खाक्या दाखवताच तिनं तिचा गुन्हा कबूल केला. आपल्या साडेतीन वर्षाचा मुलगा आजारी असतो, मात्र आरोहीमुळं आपल्याला त्याची नीट काळजी घेता येत नव्हती, त्याचं संगोपन करता येत नव्हतं, म्हणून आपणच आरोहीचा खून केल्याचं तिनं सांगितलं.
ज्या मंदिरावजवळ रितूनं आरोहीला टाकलं तिथून पोलिसांनी एक लहान मुलीचा सांगाडा ताब्यात घेतला असून तो डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.