www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 साली उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे. 1984 दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.
गेल्या आठवड्यात राहुल यांच्या घराबाहेर अशीच निदर्शनं झाली होती. त्यातच आज पुन्हा एकदा ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापटही झाली. निदर्शकांनी सुरक्षा बॅरीकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला.
या पुढची निदर्शनं पंतप्रधानांच्या घरासमोर करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय.1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्याचं भूत काँग्रेसच्या मानगुटीवर पुन्हा बसल्याचं चित्र आहे.
1984 साली झालेल्या दंगलीविरोधात आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या घराबाहेर शीख संघटनांनी निदर्शनं केली.
गेल्या आठवड्यात राहुल यांच्या घराबाहेर अशीच निदर्शनं झाली होती. त्यातच आज पुन्हा एकदा ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापटही झाली.
निदर्शकांनी सुरक्षा बॅरीकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला. या पुढची निदर्शनं पंतप्रधानांच्या घरासमोर करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.