नवी दिल्ली : बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारनं बोलावलेल्या या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार टाकला. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला.
तर तृणमूल काँग्रेसचे खासदारही या बैठकीला अनुपस्थित होते. हे अधिवेशन सुरळीत चालावं यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत सहकार्याचं आवाहन केलं. निवडणूक काळात काही मुद्यांवर मतभेद असले तरी संसदेचं कामकाज सुरळीत चाललं पाहिजे असं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं. दरम्यान बजेट अधिवेशनाच्या काळात तृणमूलचे खासदार संसदेत गैरहजर राहणार आहेत.