मुंबई : देशातील स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा अव्वलस्थानी आहे. 2016 स्वच्छ सर्वेक्षणानुसार स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत 75 जिल्ह्यांचा समावेश आहे.
पहिल्या स्थानी सिंधुदुर्ग असून दुसऱ्या स्थानी पश्चिम बंगालमधील नादिया हे राज्य आहे. तिसऱे स्थान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने पटकावलेय. चौथ्या स्थानी पश्चिम बंगालमधील मिदनापोर आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्रातील कोल्हापूर आहे.
गुजरातमधील 13 जिल्ह्यांचा स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे. डोंगराळ भागातील 22 जिल्ह्यांचा स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे.