www.24taas.com, पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे सोमवारी सुर्याची उपासना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या छट पूजेच्य तिसऱ्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ जणांना प्राण गमावावे लागले आहे. तर इतर अनेक जण जखमी झाले आहे.
गंगा नदीजवळ अदालतगंज घाट येथे बनविण्यात आलेला तात्पुरता पूल तुटल्याने एकच हल्लकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १४ जण ठार झाल्याचे पाटणाच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिक्षक ओ. पी. चौधरी यांनी सांगितले. यात नऊ मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे.
छटपूजेसाठी सोमवारी गंगा नदीवर जाण्यासाठी अदालतगंज येथे वाळूच्या मैदानावर बांबूचा एक तात्पुरता पूल बनवला होता. आज भाविकांची गर्दी वाढली आणि जबरदस्त गोंधळ माजला. या गोंधळात चेंगराचेंगरी झाली १४ जणांना प्राण गमवावा लागला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.