सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे, डॉक्टर्सचा नवा रिपोर्ट

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. सुनंदाच्या मृत्यूची चौकशी करत असलेली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनं मोठा खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये सुनंदाच्या मृत्यूचं कारण विष सांगितलं गेलंय. 

Updated: Oct 10, 2014, 09:40 AM IST
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे, डॉक्टर्सचा नवा रिपोर्ट title=

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. सुनंदाच्या मृत्यूची चौकशी करत असलेली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनं मोठा खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये सुनंदाच्या मृत्यूचं कारण विष सांगितलं गेलंय. 

एम्स मेडिकल बोर्डच्यावतीन तीन डॉक्टरांच्या टीमनं विसरा रिपोर्ट दुसऱ्यांदा तपासला. तपासाअंती सुनंदाच्या शरीरात विषाचे काही अंश असल्याचं निष्पण्ण झालंय. पण हे विष कोणत्या प्रकारचं होतं, याबाबत खुलासा करण्यात आला नाही. एम्स मेडिकल बोर्डनं हा रिपोर्ट २७ सप्टेंबरला तयार केला आणि ३० सप्टेंबरला सरोजनी नगर पोलीस स्टेशनला सोपवण्यात आला. 

एम्स मेडिकल बोर्डानं ही सुद्धा शिफारीस केलीय ज्यात बेड शीट आणि कालीनवर सुनंदाचं मृत शरीर ठेवलं गेलं होतं. त्याचीही फॉरेंसिक चाचणी व्हावी. सुनंदा हेल्दी होत्या आणि त्यांना हृदय, किडनी, लीवर आणि आतड्यांचा कोणताही आजार नव्हता.  

जेव्हा शशि थरूर यांना विसरा रिपोर्टबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी पहिलेपासूनच सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याच वर्षी दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या रुम. नं. ३४५मध्ये सुनंदाचा मृतदेह सापडला होता. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.