नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एल दत्तू यांच्या नावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असलेल्या एच एल दत्तू यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून २७ सप्टेंबरला नियुक्ती करण्यात येणार आहे.
विद्यामान मुख्य न्यायाधीश आर एम लोढा यांचा २७ सप्टेंबरला कार्यकाळ संपत असून ते निवृत्त होत आहेत. मुख्य न्यायाधीश म्हणून दत्तू यांना वर्षभरापेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. दत्तू हे डिसेंबर २०१५ पर्यंत मुख्य न्यायाधीश पदावर राहतील.
मोदी सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून राष्ट्रीय न्यायालयीन नियुक्ती आयोग स्थापण्यासंदर्भातला कायदा पारित केला आहे. या आय़ोगाचे मुख्य न्यायाधीश हे अध्यक्ष असतील. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.